प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।
नमस्कार मंडळी,
आम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव सप्टेंबर ६ (गणेश चतुर्थी) पासून सप्टेंबर १६ (अनंत चतुर्दशी) पर्यंत असे १० दिवस आपण आपल्या (हक्काच्या) मंदिरात साजरा करणार आहोत.
१० दिवस दैनिक आरती – सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ६:३० आणि शनिवार रविवार सकाळी ११:३० वाजता असेल.
सप्टेंबर १४ शनिवार रोजी सकाळी ९ ते ११, महागणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन कार्यक्रम आयोजित केला आहे. सहस्त्रावर्तना नंतर विठ्ठल अभिषेक, महाआरती आणि प्रसाद असेल.
तुम्हाला सहस्त्रावर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर खालील लिंक वर register करा.
लिंक –
https://forms.gle/xrDC6bNjvVh7S7Lx8
तुम्हाला दैनिक आरती सेवा, प्रसाद सेवा, अथवा पुष्प सेवा करायची असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
वास्तू विभाग